पुंडलिकनगरमध्ये घरफोडी; लाखांचा ऐवज लंपास

Foto
बहिणीकडे गेलेल्या भावाचे घर फोडून  अज्ञात चोरट्यानी रोख रकमेसह सोनेचांदी असा एक लाख रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना पुंडलिकनगर मधील मल्हार चौकात घडली. विजय उत्तमराव पाटील (वय-54 रा.सक्सेस विहार, मल्हारचौक, पुंडलिकनगर)हे 15 ऑगस्ट रोजी परिवारासह बहिणीकडे मालेगाव येथे गेले होते. घरी कोणीही नसल्याची संधी साधत चोरट्यानी डाव साधला. दोन दिवसानंतर घरी आल्यावर त्यांना घराच्या दरवाज्याची कुलूप तोडलेला दिसला.त्यांनी घरामध्ये जाऊन पाहिले असता घरातील कापटमधील सर्वसामान अस्ताव्यस्त होते.त्यांनी कपाटाची पाहानी केली असता 25 हजार रुपये रोख रक्कम, 79  हजार 300 रुपये किमतीचे सोने-चांदीचे दागिने असा 1 लाख 4हजार 300 रुपयांचा ऐवज चोरट्यानी लंपास केल्याचे निदर्शनास आले.या प्रकरणी पुंडलीकनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.